पुणे: टीईटी प्रकरणातील (TET Exam) मुख्य आरोपी प्रितिश देशमुखला जामीन मंजूर झाला आहे. सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितिश दिलीपराव देशमुख (Pritish Deshmukh) यास पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. न्यायाधीश श्रीमती व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिला आहे. सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षक भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचे संचालनाचे काम हे जी. ए. सॉफ्टवेअर (G.A.Software) कंपनीस देण्यात आले होते.
सदर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून अपात्र उमेदवारास पात्र म्हणून घोषित करून तसा निकाल जाहीर केल्याचा आरोप प्रितिश देशमुखवर आहे. प्रकरणाची उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणाबाबत फिर्याद दिली होती. या प्रकरणात संचालक प्रितिश देशमुख यास दिनांक २२/१२/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती. प्रीतिश देशमुख याची रु. ५०,०००/- रक्कम रुपयाचे जातमुचलक्यावर सुटका केलेली आहे. तसेच त्यावर देशाबाहेर न जाण्याची व पुराव्यात छेडछाड न करण्याची व इतर बंधने लादण्यात आलेली आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.