TET परीक्षांच्या तारखांबाबत विचार करण्याची विनंती- राजेश टोपे Saam Tv
मुंबई/पुणे

TET परीक्षांच्या तारखांबाबत विचार करण्याची विनंती- राजेश टोपे

रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक (ब्युरो चिफ मुंबई)

मुंबई: रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु आरोग्या विभागाची परीक्षा (Health Departmenr) आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. कारण काही उमेदवारांनी टीईटी (TET) परीक्षेचा देखील अर्ज भरलेला आहे. त्यामुळे नक्की कोणत्या परीक्षेला जायचं आहे असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा आहे. त्याबद्दल राजेश टोपेंना विचारले असता ते म्हणाले ''३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटीची) परीक्षा एकत्र आल्या आहेत. त्यासंबंधी मी वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना विनंती केली आहे, आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा''. त्याचबरोबर राजेश टोपेंनी शिक्षक संचालकांशी बोलल्याचं देखील सांगितले. अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल. विद्यार्थीचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असा विश्वास राजेश टोपे यांनी दिला आहे.

दरम्यान परीक्षेच्या एक दिवस आधी आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थांनमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलन देखील केले. त्या रद्दा झालेल्या परीक्षांचं खापर न्यासा या कंपनीवरती फोडण्यात आले. ती ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे तिला काम का दिलं अशा टीका झाल्या. त्यानंतर राज्य सरकार परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आणि विद्यार्थांना दिलासा दिला. परंतु टीईटी परीक्षांच्या ताराखांवरुन घोळ काही संपेना असं म्हणायची वेळ आली आहे.

जालन्यातील पावसाबाबत बोलताना...

जालन्यात झालेल्या मुसळधार पासवाबाबत बोलताना टोपे म्हणाले जूनपासून आतापर्यंत ३ ते ४ वेळा जोरदार पाऊस झाला आहे. अनेक तालूक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले असल्याचेही टोपे म्हणाले. ५ ते ७ दिवसात पंचनामे पूर्ण गेले जावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन विभागाने दिल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT