टीईटी आणि यूपीएससी परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यी संभ्रमात Saam Tv
मुंबई/पुणे

टीईटी आणि यूपीएससी परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यी संभ्रमात

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ही एकाच दिवशी येत आहे.

डाॅ. माधव सावरगावे

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा Maharashtra State Examination परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा TET आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC पूर्वपरीक्षा ही एकाच दिवशी येत आहे. यामुळे दोन्ही परीक्षा Exam देणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेकडे पाठ आता फिरवावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला येणाऱ्या टीईटीच्या CET परीक्षेची तारीख ही बदलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात येत आहे.

राज्यामध्ये state १० लाखांहून अधिक बी. एड. B.Ed धारक बेरोजगार आहेत .शासकीय अनुदानित शाळांमधील भरतीसाठी २०१३ पासून महा टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. जानेवारी २०२१ मध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, कोरोना Corona संसर्गामुळे ही परीक्षा होऊ शकलेली नाही. दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या या परीक्षेचा अखेर १० ऑक्टोबर दिवशीचा मुहूर्त ठरला आहे.

हे देखील पहा-

विद्यार्थी कार्यकर्ता दत्तात्रेय फडतरे म्हणाले की, काही महिन्यांअगोदर केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा याच दिवशी होणार असल्याचं घोषित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने याविषयी कोणताही विचार न करता, त्याच दिवशी टीईटी परीक्षा होणार असल्याचे काही दिवसांअगोदर जाहीर करण्यात आले आहे.

लाखो उमेदवार परीक्षा देण्याचे नियोजन करत असतात. परंतु, एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणे गैरसोयीचे यावेळी ठरणार आहे. या संबंधी फडतरे यांनी मुख्यमंत्र्यांना CM या परीक्षासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले आहे. टीईटीचा ऑनलाइन अर्ज Apply online ​भरण्याची अंतिम तारीख ही २५ ऑगस्ट राहणार आहे. यामुळे अजूनही अर्जांची संख्या वाढणार आहे.

आकडेवारी बोलतात...

टीईटीला २०२० मध्ये बसलेली संख्या : ३ लाख ४३ हजार

यावर्षी टीईटीसाठी आजवर आलेले अर्ज : २० हजार

यूपीएससीची पूर्व परीक्षा देणारे राज्यातील उमेदवार अंदाजे : ७ ते ८ लाख

दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे : २५ ते ३० हजार

तारखेमधील बदल आवश्यक :

प्रथमच दोन्ही परीक्षा एकत्र

खूप मोठा कालावधीमध्ये कोणतीच भरती नसल्याने दोन्हीकडे अर्ज भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

​एकाचवेळी दोन्ही परीक्षेचा अभ्यास शक्य नाही

टीईटीची तारीख बदलताना निदान ८ दिवसांचा फरक आवश्यक आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT