तीन संशयित दहशतवाद्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी; ATSच्या हाती मोठे धागेदोरे  Saam TV
मुंबई/पुणे

तीन संशयित दहशतवाद्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी; ATSच्या हाती मोठे धागेदोरे

महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) अटक केलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुरज सावंत

मुंबई: महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) अटक केलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. एटीएसमध्ये सांगितले गेले की, त्यांच्या तपासादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय पैशाच्या मार्गाबाबत माहिती मिळाली आहे. या मनी ट्रॅकबद्दल सविस्तर माहिती मिळवणे गरजेचे आहे. जेणेकरून हा निधी कोठून येतो, कोण आणतो, हे शोधले जाऊ शकते आणि भविष्यात ते थांबवले जाऊ शकते. दिल्ली स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसलाही अशाच एका संशयित दहशतवाद्याशी संबंधित माहिती मिळाली, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने एक -एक करून तीन लोकांना अटक केली.

झाकीर शेख, रिझवान मोमीन आणि मोहम्मद इरफान रहमत अली शेख अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, मोहम्मद इरफानच्या खात्यात 50 हजार रुपये अमेरिकेहून आले होते, त्यानंतर त्याने हे पैसे झाकीरला दिले. झाकीरला लखनौला पळून जायचे होते. एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, झाकीरला जेव्हा कळले की दिल्ली स्पेशल सेलने संशयित दहशतवाद्यांना पकडले आहे, तेव्हा त्याने त्या 50 हजार रुपयांपैकी एक हजार रुपये घेऊन त्याने लखनऊला जाणाऱ्या गाडीचे तिकीट बुक केले आणि तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र महाराष्ट्र एटीएसने त्यांना पकडले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT