Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Pune Bus Accident : या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Prachee kulkarni

Pune Bus Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर चौफुला तालुका दौंड जवळ आराम बस रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडकून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जखमी झाले आहेत. जखमी मधील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करीत होते. बस (Bus) सोलापूरकडून पुण्याच्या (Pune) दिशेने जात होती त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाचच्या सुमारास सोलापूरकडून एक ट्रॅव्हल्सन पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान या मार्गावर एका ट्रकचा टायर फुटला असल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने ट्रकला जोरदार धडक दिली. यावेळी बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT