Shirur Accident 
मुंबई/पुणे

Shirur Accident : बाळुमामा पालखी दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; आठ जण गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर

Shirur Truck Accident News : या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली.

रोहिदास गाडगे

Pune Accident News : बाळुमामाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या करमाळा येथील भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. धार्मिक कार्यक्रम उरकून घरी परतत असताना न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. (Latest Marathi News)

या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण करमाळा जिल्हा सोलापूर (Solapur) येथील रहिवाशी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही अपघात एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघात कसा झाला?

करमाळा येथील भाविक बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व भाविक परतीच्या मार्गावर पिकअप गाडीतून करमाळ्याच्या दिशेने निघाले होते.

न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहीवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारे तसेच भाविक बसलेले पिकअप आणि न्हावरेच्या दिशेकडून येणारा ट्रँक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. ट्रँक्टर चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याने हा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली. तसेच या भीषण अपघातात (Accident) दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्यांनतर ट्रँक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. (Pune Accident News)

अपघातात जखमी झालेल्याची नावे

चोपडे (वय ४०)

श्रुती दुर्गडे (वय ३०)

शोभा परमेश्वर महानवर (वय ५५)

मिना वाघमोडे (वय ४५)

सावित्री आशिष पाटील (वय ४०)

रुपाली अण्णा केसकर (वय ३०)

कविता युवराज बोराटे (वय ३५)

अंजली महारनोर (वय ७)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT