Thane Tennis Coach Rapes Minor Girl Saam Digital
मुंबई/पुणे

Thane Tennis Coach Rapes Minor Girl: टेनिस प्रशिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता ७ आठवड्यांची गरोदर

Accused Is Married, Two Children: आरोपी विवाहित, दोन मुलेही असून तो स्पोर्टस शिक्षक म्हणून काही सोसायटी आणि शाळांमध्ये प्रशिक्षणही देतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane Tennis Coach Rapes Minor Girl

ठाण्यातील एका टेनिस प्रशिक्षकाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पोलिसांनी या प्रशिक्षकाला अटक केली असून धक्कादायक म्हणजे पीडित मुलगी ७ आठवड्यांची गरोदर राहिल्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

रवींद्र गवळी असं प्रशिक्षकाच नावं असून तो नवी मुंबई येथील रहिवासी आहे. सदर प्रशिक्षक पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या विश्वासातील आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिचे कुटुंबीय तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून औषधं दिली. मात्र तरीही पोटातील वेदना थांबल्या नाहीत. उलट वेदना आणखी वाढल्या. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे सोनोग्राफी केल्यांनतर ती सात आठवड्यांची गरोदर असल्याचं समोर आलं.

आरोपी टेनिस प्रॅक्टिस दरम्यान काही महिने पीडितेशी चुकीच्या पद्धतीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं हे वर्तन दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे पीडित मुलगी मानसिक तणावामध्ये होती. त्यांनतर एकेदिवशी आरोपीने पीडित मुलीगी राहत असलेल्या एका सोसायटीनजीक निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

आरोपी रवींद्र गवळी विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. तो स्पोर्टस शिक्षक म्हणून काही सोसायटी आणि शाळांमध्ये प्रशिक्षणही देतो. दरम्यान आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT