Virar Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Virar Fraud News: धक्कादायक! टेम्पो भाड्याने लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक; चालकांना घातला लाखो रुपयांचा गंडा

Vasai Virar News: ज्या वाहनधारकांची मुस्तफाने फसवणूक केली आहे त्यांनी विरार पोलिसात तक्रार करावी असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

चेतन इंगळे

Vasai virar News: नालासोपारा वसई विरार शहरातील खाजगी व ट्रान्सपोर्टची वाहने भाड्याने देण्याचे आमिष दाखवून अनेक गाड्या मालकांना गंडा घालणाऱ्या एका महाठगाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मुस्तफा उद्दीन असे या ठगाचे नाव असून त्याने आजपर्यंत अनेक गाडी मालकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद उद्दीन हा आरोपी ट्रान्सपोर्ट टेम्पो, आयशर ट्रक व कार एका ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या नावाने करार करून गाडी मालकांकडून घ्यायचा. मात्र महिन्याचे भाडे द्यायची वेळ आली की, ते पैसे स्वतः वापरून तो ऐश आराम करत होता. कोणाचे 2 लाख तर कोणाचे पाच लाख असे अनेक महिन्यांचे भाडे थकवून त्याने वाहनधारकांची फसवणूक केली होती. विरारमध्ये राहणाऱ्या एका माजी नगरसेवकाची इनोव्हा कार भाड्याने घेऊन आरोपीने अशाच पद्धतीने त्यांची फसवणूक केली होती.

या प्रकरणी विरार पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुस्तफा उद्दीनला अटक केली आहे. पोलिसांनी दोन दिवसात त्याकडून तीन टेम्पो हस्तगत केले असून अधिक तपास केला जातं आहे. ज्या वाहनधारकांची मुस्तफाने फसवणूक केली आहे त्यांनी विरार पोलिसात त्याची तक्रार करावी असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT