विश्वविजेता टीम इंडियाचे टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत आगमन झालं आहे. भारतीय संघाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. यातच वानखेडे स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या लाडक्या संघाला पाहण्यासाठी येथे जमले आहेत. मात्र यावेळी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत टीम इंडियाची विजय रॅली निघणार आहे. यासाठी एक खास बस तयार करण्यात आली आहे. हीच रॅली पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत.
मुंबईतील वरळी ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ही विजय रॅली निघणार आहे. यातच आज चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. या स्टेडियमची क्षमता ३५ ते ४० हजार इतकी आहे. मात्र यापेक्षा जास्त गर्दी तिथे जमली आहे. तसेच जितके चाहते हे स्टेडियमच्य आतमध्ये जमले आहेत, त्यापेक्षा जास्त गर्दीही स्टेडियमबाहेर जमली आहे.
यावेळी अनेक चाहते हे वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे वानखेडे स्टेडियम गेट नंबर २ येथे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी गर्दी नियंत्रित आणण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तसेच पोलिसांनी आता वानखेडे स्टेडियमचे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, टीम इंडियाच्या विजय रॅलीला सुरुवात झाली आहे. एका ओपन बसमधून ही विजय रॅली निघाली आहे. भारतीय संघाला पाहण्यासाठी जनसागर लोटला आहे. मुंबईत पाहावं तिथेच गर्दी पाहायला मिळत आहे. तब्बल १७ वर्षानंतर मुंबईने टी २० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. याआधी २००७ मध्ये टीम इंडियाने टी २० वर्ल्डकप जिंकला होता. यामुळेच चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.