फर्ग्युसन रस्त्यावर चक्क ‘चहा-चपाती’चा ट्रेंड सागर आव्हाड
मुंबई/पुणे

फर्ग्युसन रस्त्यावर चक्क ‘चहा-चपाती’चा ट्रेंड

चहा-चपाती आता पुण्यातील गजबजलेल्या स्मार्ट रस्त्यांवर आपली जागा निर्माण करत आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - न्याहरीसाठी पोहे, मिसळ, इडली-उथप्पा, वडापाव असे अनेक खवय्ये ‘ट्रेंड’ अस्तित्वात आहे. अमृततुल्यच्या बाबतीतही स्पेशल, कडक, मसालेदार, आयुर्वेदिक असे अनेक ट्रेंड पुणेकरांना नवीन नाही. पण, फर्ग्युसन महाविद्यालयासमोरील रस्त्यावर चक्क ‘चहा आणि चपाती’चा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

हे देखील पहा -

वास्तविक पाहता चहा आणि चपाती मराठी माणसासाठी नवीन नाही. आपल्या लहानपणी बहुतेकांनी शाळेत जाण्यापूर्वी किंवा कामावर जाताना चहा आणि चपातीचा आस्वाद नक्कीच घेतला असेल. आता तीच चहा-चपाती ग्लोकल स्वरूपात फर्ग्युसनच्याच माजी विद्यार्थ्यांनी समोर आणली आहे.

अक्षय चव्हाण, धनश्री पाटील आणि अक्षय भैलुमे यांनी हे भन्नाट हॉटेल सुरू केले आहे. तेल-तूप लावलेल्या चहा-चपाती बरोबरच, चपाती साखर, शेंगदाना चपाती आदी प्रकारही ते देत आहेत. अनेक वर्षे स्वयंपाक घरात दुर्लक्षित असलेली चहा-चपाती आता पुण्यातील गजबजलेल्या स्मार्ट रस्त्यांवर आपली जागा निर्माण करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

SCROLL FOR NEXT