कोल्हापुर : कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरातील व्यापारी पेठा शंभर दिवस बंद होत्या. प्रशासनाने प्रयोग म्हणून मागील पंधरवड्यात फक्त पाच दिवस दुकान उघडण्यास परवानगी दिली. त्यानंतर पुन्हा आठवडाभर दुकानं बंद करण्यात आली. आता पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यामुळे आज (साेमवार) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरमधील दुकान सुरू होत आहेत. यामुळे कोल्हापुरातील व्यापारी kolhapur traders आनंदात आहेत. आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा दुकान उघडण्याची लगबग कोल्हापुरातील व्यापारी पेठांमध्ये दिसत आहे. (kolhapur-traders-declared-discount-vaccination-customers-sml80)
सोशल डिस्टंसिंग पालन करून व्यवसाय करण्याचा मनोदय या व्यावसायिकांनी केला आहे. कोल्हापुरातील व्यापार आणि सर्व व्यवसाय आजपासून सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये खूप मोठा उत्साह दिसून येत आहे.
कोल्हापुरमधल्या राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी आज (साेमवार) दुकान उघडताना सजवलेल्या बैलगाडीतून रॅली काढली. सनई-चौघडयाच्या गजरात सर्व बाजारपेठेत फेरफटका मारला. मास्क वापरा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुन्हा एकदा व्यापार सुरू झाल्याने उत्साहात असलेल्या व्यापाऱ्यांनी लस घेतलेल्या ग्राहकांसाठी विशेष सवलत देणार असल्याचे घोषित केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.