Mumbai Marathon 2023
Mumbai Marathon 2023 Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Marathon 2023 : रन मुंबई रन… तब्बल दोन वर्षानंतर मुंबई मॅरेथॉन; मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Marathon 2023 : मुंबईत कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली.

राहुल नार्वेकर यांनी मुंबई मॅरेथॉनला (Marathon) हिरवा झेंडा दाखवला. जवळपास 55 हजार धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. या मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित रहाणार आहेत.

फुल आणि हाफ अशा दोन्ही मॅरेथॉनचा रूट हा वांद्रे-वरळी सीलिंक, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली, पेडर रोड, बाबुलनाथ मंदिर, चौपाटी आणि आझाद मैदानच्या शेजारील रस्ता असेल.अनेक उद्योगपती मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

टाटा सन्सचेचेअरमन एन चंद्रशेखरन, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे उपाध्यक्ष, एमडी आणि सीईओ गगन बंगा, SUGAR कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ विनीता सिंग, मामाअर्थचे सह-संस्थापक वरुण अलाघ, स्टारबक्स इंडियाचे सीईओ सुशांत दश, अनिल अंबानी आणि सह-संस्थापक आणि MD मयंक कुमार हे टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जागोजाग धावपटूंसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद आहे. दरम्यान, या स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहेत.

तसेच,आज होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 साठी पश्चिम रेल्वेने 15 जानेवारीच्या पहाटे दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे अशा या गाड्या धावतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT