पहिली ते चौथी शाळा सुरु होणार - Saam TV
मुंबई/पुणे

पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत 'टास्क फोर्स;चा ग्रीन सिग्नल

गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊन पासून बंद असलेल्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास 'कोविड टास्क फोर्स' ने हिरवा कंदील दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊन Lock Down पासून बंद असलेल्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा Schools सुरु करण्यास 'कोविड टास्क फोर्स' Covid Task Force ने हिरवा कंदील दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचा निर्णय टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याकडे कळवला आहे. COVID Task Force gives nod to open primary schools

कोरोनाची साथ आल्यानंतर गेल्यावर्षी शाळा बंद झाल्या. त्यानंतर गेल्या महिन्यात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. महाविद्यालयेही सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग बंद होते. आता टास्क फोर्सने त्यालाही अनुकूलता दर्शवली आहे.

राज्यातल्या पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा नियम पाळून सुरु करण्यास हरकत नाही, असे टाक्स फोर्सचे मत आहे. लांब राहून खेळता येणाऱ्या (उदा. क्रिकेट, धावण्याच्या स्पर्धा) खेळांनाही शाळांमध्ये परवानगी देण्याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत डाॅक्टराचे एकमत झाले आहे. मतिमंद मुलांच्या शाळाही नियम पाळून सुरु करण्यास हरकत नाही, असे टास्क फोर्सचे मत आहे. COVID Task Force gives nod to open primary schools

शाळा-महाविद्यालयांच्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन त्यांना वसतीगृहात दाखल करुन घ्यावे, एखादा विद्यार्थी पुन्हा बाहेर गेला तर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करावी, असेही टास्क फोर्सचे मत आहे. केंद्राशी बोलून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत शासनाने तत्परता दाखवावी व शाळा सुरु करत लसीकरण करावे, असेही टास्क फोर्सचे मत आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT