Mumbai Goa Highway Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग

Mumbai Goa Highway Fire News: मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन कदम

Mumbai Goa Highway Fire News: मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग लागल्याची घटना घडली. कशेडी घाटात पोलादपूर हद्दीतील भोगाव गावाजवळ केमिकल टँकरला ही आग लागली असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत वाहने थांबवली होती.

घटनास्थळी महाड एमआयडीसी अग्निशमन दल दाखल झाले असून त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझल्यानंतर आता वाहतुक सुरु करण्यात आली आहे. अपघातग्रस्त हा टँकर खोपोली येथून जयगडला चालला होता. सुदैवाने हा टँकर रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला आणि या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, याच महिन्यात पुणे येथील दौंड रेल्वे स्थानकात एका रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. येथील रेल्वे स्थानकात साइडिंगला लावलेल्या रॅक मधील एका रिकाम्या डब्ब्याला ही आग लागली होती. यामध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते. (Latest Marathi News)

या डब्बायला आग लागल्यानंतर येथील रॅकच्या वर उच्च क्षमतेच्या वीजवाहक तारा होत्या. मात्र रेल्वे प्रशासनाने वेळीच आग विझविल्याने मोठे नुकसान टळले.

दौंड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहा पुढील पुणे बाजूला असलेल्या लोहमार्गावर प्रवासी डब्ब्यांचा एक रॅक साइडिंगला लावलेला आहे. त्यापैकी एक प्रवासी डब्बाला आग ही लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Dhanteras Horoscope 2026: धनत्रयोदशीला कोणत्या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या मेष ते मीन राशींचं भविष्य

सरकारकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट! सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पहिलं उड्डाण कधी? तिकिटाचे दर अन् वेळापत्रक पाहा

दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ६ सुपरफूड्स; मजबूत हाडांसाठी आजच आहारात समाविष्ट करा

पोटातून गुडगुड आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT