Jayant Patil प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कुशिवली गावातील तनिष स्टोन क्रशर कंपनी बंद करा, राष्ट्रवादीची मागणी

कल्याण पूर्व विधान सभेतील कुशिवली गावात तनिष स्टोन क्रशर कंपनी असून सदर कंपनीचा मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली  - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी भेट घेतली असून कुशिवली गावतील तनिष स्टोन क्रशर कंपनी बंद करण्याबाबत पत्र दिले आहे. याबाबत सुधीर पाटील यांनी सांगितले की कल्याण पूर्व विधान सभेतील कुशिवली गावात तनिष स्टोन क्रशर  कंपनी असून सदर कंपनीचा मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे.

हे देखील पहा -

कंपनी करत असलेल्या स्फोटामुळे कुशिवली गावातील मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या शेकडो ग्रामस्थांच्या घरांना तडे पडले आहेत. तसेच गावातील विहिरी व बोरिंगचे पाणी पूर्णपणे नाहीसे झाले आहे. त्यामुळे गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सदर कंपनी विरोधात तहसीलदार अंबरनाथ यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील काहीही कारवाई केली जात नाही.

तरी या सर्व प्रकरणामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. तर यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगेचच अंबरनाथ तहसीलदार यांना संपर्क साधून क्रशर कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर तहसीलदार यांनी सांगितले की, क्रशर कंपनी बंद करण्यासाठी शासनास अहवाल दिला आहे. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील तहसीलदारांना कुशिवली गावाची पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT