Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

केरळचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारख होणार नाहीना?; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. यावेळी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण करताना विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देत असतानाच त्यांनी अनेक मिश्कील टीका टीप्पणी देखील केली.

आम्ही केंद्राकडे अनेक गोष्टींसाठी वारंवार पाठपुरावा करतोय मराठी भाषा अभिजात दर्जासाठी असो वा बॉम्बे उच्च न्यायालयाचे नाव मुंबई उच्च न्यायलाय (Mumbai High Court) करण्यासाठी असो तसंच कर्नाटक व्याप्त बेळगावचा प्रश्न असो केंद्र सरकार कोणाची बाजू घेतय ते न्यायालयातील कागदपत्र, कामकाज पाहिल्यावर कळत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले याबाबतीत कोण बोलणार आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दहिसर भुखंडाचा मुद्द्यावरती देखील भाष्य केलं ते म्हणाले, दहिसर भूखंड पाठवरवठा २०११ पासून सुरु झाला आहे याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) सही असल्याचं सांगत असताना ते म्हणाले, या ठिकाणी तुमची सही आहे Do The Needful असं आपण म्हंटलेल त्यावेळचे तुमचे विधानपरिषदेचे धनंजय मुंडे आता विधान त्यावेळचा उल्लेख इथे केला तर चालेल ना अगदी केरळाचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं तर होणार नाही ना ? अहो मला माहित नाही ओ म्हणून विचारतो आहे असं मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) म्हणताच विधानसभेत एकच हशा पिकला. कारण त्यांनी हे वक्तव्य केंद्रीयमंत्री नारायण राणेंना उद्देशून केलं आहे.

काय आहे केरळ तामिळनाडू प्रकरण-

लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केरळच्या खासदाराच्या प्रश्नावर (MP) तामिळनाडूचे उत्तर दिले होते. केरळचे खासदार सुरेश कोडीकुन्नील यांनी एक प्रश्न विचारला होता कोरोनाकाळात उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. या काळात सरकारने काय मदत केली. याचे सविस्तर उत्तर देण्याचे आवाहन केले.

या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, मा. अध्यक्ष महोदय. Corona महामारीच्या २ वर्षाच्या काळात अनेक उद्योग क्षेत्रावरती गंभीर परिणाम झाला आहे.तसंच नुकसान झालेल्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यातून आम्हाला तामिळनाडूमध्येही अनेक उउद्योग सुरू करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांना कर्ज दिले. सबसिडी दिली. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जितके उद्योग होते ते पुन्हा एकदा सुरू झाले. मात्र, या उत्तरावर सभापती महोदयांनी हरकत घेतली. सुरेश कोडीकुन्नील हे केरळचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर राणे म्हणाले तर तुम्ही तामिळनाडू समजून घ्या, असा उल्लेख केला. त्यानंतर सभापतींनी केरळ म्हणत त्यात पुन्हा सुधारणा केली आणि पुढला प्रश्न पटलावर घेतला होता या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मिडीयावक चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे आज याच प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी राणें प्रकरणावर मिश्कील टोला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT