Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : ताम्हिणी घाटात भयंकर घडलं! ६ जिवलग मित्रांचा मृत्यू, 'त्या' हॉटेलचालकामुळे उलगडला अपघाताचा थरार

Pune Raigad Tamhini Ghat Accident Death : ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला असून पुण्यातील ६ तरुणांचा थार गाडी दरीत कोसळून मृत्यू झाला. फोन न लागल्याने सुरू झालेल्या शोधातून हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • ताम्हिणी घाटात थार गाडी दरीत कोसळली

  • सहा तरुणांचा जागीच मृत्यू

  • फोन न लागल्याने शोध मोहीम सुरू

  • रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढले

ताम्हिणी घाटात झालेल्या दुर्दैवी अपघाता मागचं गुढं समोर आलं आहे. कोकणात फिरण्यासाठी निघालेल्या ६ तरुणांवर काळाने घाला घातला. पुण्याहून थारने निघालेल्या ६ जणांच्या गाडीचा ताम्हिणी घाटात गाडी पलटी होऊन मृत्यू झाला. गाडीचादेखील या अपघातात चेंदामेंदा झाला. पोलीस या घटनेचा अद्यापही तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील ६ तरुण कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. सहलीची पूर्वतयारी म्हणून या तरुणांनी कोकणातील एका हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या होत्या. मात्र नियोजित वेळेत पर्यटक हॉटेलवर वेळेवर पोहोचले नाहीत. बुधवारी सकाळी हॉटेलचालकाने त्यांच्या मोबाइलवर वारंवार फोन केले, पण कोणाचाच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून हॉटेलचालकाने पुण्यातील या तरुणांच्या एका मित्राला फोन लावला आणि सहा जण अद्याप पोहोचले नसल्याचे सांगितले.

दरम्यान बुधवारी संध्याकाळी मुलांचा फोन लागत नसल्याने तरुणांपैकी एका मुलाच्या वडिलांनी पुण्यातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पुढे माणगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. यादरम्यान या सहा जणांचे मोबाइल बंद असल्याने त्यांचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते ताम्हिणी घाटातील दिवा अंधार परिसरात आढळले.

पोलिसांना २० नोव्हेंबर रोजी म्हणजे काल सकाळच्या सुमारास तपास करताना एक थार गाडी आणि मृतदेह दरीत आढळले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट ५०० फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात गाडीमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी रेस्क्यू टीमने जीव पणाला लावून ५०० फूट खाली उतरून ६ मृतदेह बाहेर काढले.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सहा तरुण पुण्यातील कोंढवे परिसरातील रहिवासी होते. यात प्रथम चव्हाण (वय २२), पुनीत शेट्टी (वय २०), साहिल बोटे (वय २४), महादेव कोळी (वय १८), ओंकार कोळी (वय १८) आणि शिवा माने (वय १९) यांचा समावेश होता. दरम्यान कोकणातल्या त्या हॉटेलचालकाचा कॉल आला नसता तर हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले नसते. हा अपघात रात्रीच्या सुमारास घडल्याने अंधारात कोणाच्या लक्षात आलं नसावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अजूनही तपास करत आहेत. या अपघाताचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नराधमाला फाशी द्या! मालेगावमध्ये मोर्चादरम्यान आंदोलकांनी गेट तोडलं, पोलिसांचा लाठीचार्ज |VIDEO

Shocking : 'तू लडका है या लडकी' म्हणत तरुणीचा विनयभंग अन् मारहाण,उल्हासनगर हादरलं!

Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी इकडे आड, तिकडे विहीर! काँग्रेस-मनसेच्या भूमिकेमुळे अडकले कात्रीत

Hirve Moong Bhaji Recipe: हिरव्या मुगाची झणझणीत भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT