Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Tamhini Ghat Accident : नवीन थार घेतली, कोकणात ट्रिप ठरली; पण नियतीनं घात केला; ६ तरूण व्यावसायिकांचं स्वप्न अधुरंच राहिलं

Tamhini Ghat Thar Accident Death News : व्यवसायात यश मिळालं आणि मित्राने गाडी घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ६ तरुण पुण्याहून कोकणात निघाले होते. मात्र ताम्हिणी घाटात त्यांची थार दरीत कोसळून तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस तपास सुरू असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • सहा जिवलग मित्र कोकण फिरायला निघाले होते

  • ताम्हिणी घाटात थार कार दरीत कोसळली

  • या अपघातात ६ तरुणांचा जागीच मृत्यू झाला

  • पोलिसांनी ४ दिवसांनी अपघात उघडकीस आणला

पुणे-रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात थार गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी पुण्याहून कोकणात फिरण्यासाठी हे तरुण निघाले होते मात्र वाटेत त्यांना मृत्यूने गाठलं. हे सहाजण जिवलग मित्र होते. नुकताच त्यांनी छोटा व्यवसाय सुरु केला होता परंतु नियतीने ऐन तारुण्यात त्यांना हिरावलं.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम चव्हाण (वय २२), पुनीत शेट्टी (वय २०), साहिल बोटे (वय २४), महादेव कोळी (वय १८), ओंकार कोळी (वय १८) आणि शिवा माने (वय १९) हे सहा जण पुण्याचे रहिवाशी होते. सामान्य कुटुंबातील या ६ तरुणांनी गरिबीतून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. साहिलचे वडील रिक्षा, तर प्रथमचे वडील टेम्पो चालवतात. याशिवाय शिवाच्या आईचा पूजेचे साहित्य, हार विक्रीचा व्यवसाय आहे. इतर तरुणही सामान्य कुटुंबातीलच होती. आई-वडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांनी मोमो विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.

तरुणांच्या या व्यवसायाला अल्पावधीतच यश मिळाले आणि मोमोजचे दुकान जोमाने सुरु झाले. या व्यवसायातूनच एका तरुणाने थार गाडी खरेदी केली होती. त्यातून पहिली सहल त्यांनी कोकणात काढली होती. एका वेळी सर्वांना शक्य नसल्याने सहा जण कोकणात निघाले होते, तर त्यांचे इतर मित्र व्यवसायासाठी पुण्यातच थांबले होते.

सोमवारी पुण्याहून हे ६ जण कोकणात जायला निघाले तत्पूर्वी त्यांनी राहण्यासाठी कोकणातल्या एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग केली. मात्र पुणे माणगाव दरम्यान असलेल्या ताम्हिणी घाटात तरुणांचा थार गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दरीत ५०० फूट खोल कोसळली. या दुर्घटनेत या ६ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या तरुणांचा अपघात झाल्याचे कोणालाही माहिती नव्हते मात्र पोलिसांनी केलेल्या तपासानंतर तब्बल ४ दिवसानंतर ही घटना समोर आली. पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने ६ मृतदेह बाहेर काढले. दुर्दैवाने तरुणांचं व्यवसाय करण्याचं स्वप्न नियतीने हिरावलं. या अपघातानंतर तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : : सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय तोडफोड प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Aloo Lachcha Recipe: संध्याकाळचा नाश्त्याला बनवा क्रिस्पी अन् टेस्टी आलू लच्छा, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Politics: ऐतिहासिक विजय! दोंडाईचामध्ये भाजपच्या सर्व २६ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध

Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

SCROLL FOR NEXT