Maval News, Talegaon Dabhade Muncipal Corporation, Mobile Towers saam tv
मुंबई/पुणे

Talegaon Dabhade : माेठ्या थकबाकीदारांवर कारवाई सुरु, तळेगावातील सहा मोबाईल टॉवरला पालिकेने ठोकले टाळे

ही थकबाकी न भरल्याने कारवाई करण्यात येत असल्याचे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी नमूद केले.

दिलीप कांबळे

Talegaon Dabhade Muncipal Corporation : मावळातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद (talegaon dabhade muncipal corporation) कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाई करत कर थकलेल्या एकूण सहा मोबाईल टावर्सला टाळे (talegaon dabhade municipal council seals 6 mobile towers) ठोकले. या कारवाईने माेठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. (Maharashtra News)

नगरपरिषद हद्दीतील मोठे थकबाकीदार असलेल्या कंपन्यांचे दहा मोबाईल टाॅवर पैकी सहा टॉवर्सला वसुली पथकाकडून टाळे ठोकण्यात आले आहे. यामध्ये जिजामाता चौक, राव कॉलनी, मावळ लँड, तपोदान कॉलनी या ठिकाणच्या मोबाईल टॉवरचा समावेश आहे अशी माहिती विजय शहाणे (कर निरीक्षक) यांनी दिली.

तळेगाव नगरपरिषद हद्दीतील एकूण दहा माेबाईल टाॅवर्सची एकूण 44 लाख 37 हजार 332 रुपये इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्याने कारवाई करण्यात येत असल्याचे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी नमूद केले.

आगामी काळात अन्य चार टॉवर्स देखील सील करण्यात येणार आहे. या टाॅवर्स मालकांना वारंवार इशारा देऊनही दिलेल्या कालावधीमध्ये थकीत कर न भरल्याने अखेर टाळे बंदीची कारवाई करण्यात आली आहे. तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक (vijaykumar sarnaik) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे असेही शहाणे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT