Pune, Koytam Trader, Nana Peth, Money
Pune, Koytam Trader, Nana Peth, Moneysaam tv

Pune : पुण्यातील भरवस्तीत युवकांचे धाडस; काेयता दाखवत दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचे ४७ लाख लुटले

समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Published on

- अक्षय बडवे

Pune Crime News : पुणे (pune latest crime news) शहरातील मध्यवस्तीत आज (गुरुवार) दिवसाढवळ्या एका व्यापा-ायाला (trader) काेयत्याची (koyta) भीती दाखवून युवकाने (youth) तब्बल ४७ लाख रुपये (47 lakh rupees looted in pune today) लुटलें. या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पाेलिस दाखल झाले. (Breaking Marathi News)

Pune, Koytam Trader, Nana Peth, Money
Katraj New Tunnel : कात्रज नवीन बाेगदा वाहतुकीसाठी राहणार बंद, मुंबईला जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग (पाहा व्हिडिओ)

ही घटना नाना पेठेत घडली. आझाद आळी मधून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयता दाखवत संबंधित व्यापा-याकडे पैश्याने भरलेली पिशवीची मागणी केली. घाबरलेल्या व्यापा-याराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु चाेरट्याने पिश्वी घेऊन घटनास्थळावरुन धूम ठाेकली.

Pune, Koytam Trader, Nana Peth, Money
Satara Police : तुझ्या बापाचा नाेकर आहे का ! पाेलिसाने त्याला मारली कानाखाली; Video Viral झाला ना भाऊ

या घटनेबाबत घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकीवर (pune) नाना पेठेतून निघाला हाेता. तेथील आझाद आळीतून बाहेर येताच त्यास दोन युवकांनी दुचाकीवरून येत अडवले.

त्या दोघांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी घेऊन दोघेही पसार झाले. व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com