Syndrome Disease Patients Saam tv
मुंबई/पुणे

Syndrome Disease: मेंदूच्या आजारानं वाढवलं पुणेकरांचं टेन्शन; चार रुग्णांची प्रकृती गंभीर

Syndrome Disease Patients: पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णांना व्हेंटिलेटवर ठेवून उपचार सुरू आहेत. गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Bharat Jadhav

गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराने पुणेकरांची धकधक वाढवलीय. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत अडीच पट वाढ झालीय. यात 38 पुरुष आणि 21 महिलांना या सिन्डोमची लागण झालीय. गुरुवार पर्यंत या आजाराची रुग्ण संख्या 59 होती आता यात वाढ झालीय. यातील 22 जण व्हेंटिलेटवर आहेत. या आजारामुळे आजारामुळे चार रुग्णांची प्रकृती गंभीर झालीय. यात दोन लहान मुले आणि दोन प्रौढ व्यक्ती आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात या रुग्णांना व्हेंटिलेटवर ठेवून उपचार सुरू आहेत. पुणे शहरात या आजाराचे एकूण 67 रुग्ण असून 14 रुग्णांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात एकूण 14 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. यात पुणे शहरातील सिंहगड रोड, धनकवडी, किरकेट वाडी भागतील आहे तर दोन रुग्ण हे नगर आणि सोलापूर येथील आहेत. पुणे महापालिका परिसरात 11, पुणे ग्रामीणमध्ये 33, तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यामधील आहेत.

गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दुषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं सामोर आल्यानं पुणे महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना केलीय. पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नांदेड गावात पाण्याची पाहणी केली. गावात पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीची त्यांनी पाहणी केली.

महापालिका या विहिरीबाबत आणि या आजाराबाबत काय उपाययोजना केली पाहिजे याच चर्चा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी केलीय. यावेळी महापालिका आयुक्त यांनी नविन समाविष्ट गावातील विहिरी, पाण्याच्या टाक्या व GBS आजाराने बाधित भागाचीही त्यांनी पाहणी केलीय.

आजार कसा टाळणार

पाणी उकळून प्या

शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत

भाज्या आणि फळं चांगली धुवून घ्या त्यानंतर खाव्यात.

मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवले पाहिजेत.

कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT