swayam talks Saam tv
मुंबई/पुणे

swayam talks: तरुणाईला मिळाली नव्या वाटांची ओळख; 'स्वयं टॉक्स'मध्ये प्रेरणादायी व्यक्तींनी उलगडल्या वेगळ्या वाटा

swayam talks in Mumbai : भरभक्कम पगाराची नोकरी सोडून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. तर काही तरुण आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचे अंतरंग उलगडून दाखवत आहे. तर काही तरुणांनी छायाचित्रणाच्या कलेच्या छटा दाखवल्या.

Vishal Gangurde

Swayam Talks 2024:

भरभक्कम पगाराची नोकरी सोडून काही तरुण रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. तर काही तरुण आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचे अंतरंग उलगडून दाखवत आहे. तर काही तरुणांनी छायाचित्रणाच्या कलेच्या छटा दाखवल्या. मुंबईत झालेल्या 'स्वयं टॉक्स २०२४' मध्ये तरुणांनी वेगळ्या वाटा उलगडल्या. या कार्यक्रमात प्रेक्षकांना नवं काही गवसल्याचा आनंद मिळत होता. (Latest Marathi News)

वेगळ्या वाटा निवडणाऱ्या व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा ‘स्वयं टॉक्स २०२४’ हा कार्यक्रम रविवारी मुंबईत पार पडला. पॅशन ३६० आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वांद्रे पश्चिमेतील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अनेक पैलू या कार्यक्रमात उलगडले गेले. चाकोरीची वाट सोडून विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमधील अनेक पैलू या कार्यक्रमात उलगडले गेले. स्वयं ही संस्था गेल्या ११ वर्षांपासून अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'स्वयं टॉक्स २०२४' या कार्यक्रमाचे पी. एन. गाडगीळ अँड सन्स हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते. तसेच रेडिंग्टन हे सहप्रायोजक होते. त्याचबरोबर केसरी टुर्स, निमित्त, माधवबाग आणि एजेस फेडरल इन्श्युरन्स लिमिटेड, बँक ऑफ बडोदा आणि व्हेरासिटीझ सहप्रयोगी होते.

स्वानंद केळकरने फायनान्स कंपनीतल्या नोकरीत एक वर्षाचा ब्रेक घेतला. त्यानंतर पुढील आठ महिन्यांत आठ नव्या गोष्टी शिकल्या. क्रिकेट शिकण्यासाठी गॅरी कर्स्टन यांच्या अकादमीत स्वानंद गेला होता. स्वानंदने त्याचा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

आर्टिफिशिअल इंटिलिजन्समुळे नव्या संधी, आव्हाने आणि बदलत्या टेक्नोलॉजीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पंचसूत्रीची माहिती चिन्मय गवाणकरने दिली. चिन्मयने ‘एआय’द्वारे प्रेझेंटेशन कसे तयार करायचे, याबद्दलचा व्हिडिओच दाखवला. त्यानंतर उपस्थितांना काळानुसार बदलणं का गरजेचं आहे याची जाणीव झाली.

तर प्रवीण तुळपुळे यांनी नौदलातील उत्तम पदावरील नोकरी सोडून गेली. त्यानंतर बावीस वर्षे वैद्यकीय विदुषक होऊन हॉस्पिटलमधील लोकांमध्ये आनंद पसरवणाऱ्या प्रवीण यांनी त्यांच्या अनुभवांनी उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. तसेच फारसी भाषेचा उगम, बारकावे, संस्कृत आणि फारसी भाषेतील साम्यस्थळे, मी फारसी का शिकलो हे सगळं अश्विन चितळेने त्याच्या शैलीत सांगितलं.

तर प्रवीण तुळपुळे यांनी नौदलातील उत्तम पदावरील नोकरी सोडून गेली. त्यानंतर बावीस वर्षे वैद्यकीय विदुषक होऊन हॉस्पिटलमधील लोकांमध्ये आनंद पसरवणाऱ्या प्रवीण यांनी त्यांच्या अनुभवांनी उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. तसेच फारसी भाषेचा उगम, बारकावे, संस्कृत आणि फारसी भाषेतील साम्यस्थळे, मी फारसी का शिकलो हे सगळं अश्विन चितळेने त्याच्या शैलीत सांगितलं.

फोटोग्राफीविषयी छायाचित्रकारांनी सांगितले. मोबाईल फोटोग्राफीमधील फोटो सिरिज, पुण्यातील खिडक्या-दारं, रस्त्यावर झोपलेली माणसे, हंपी, नऊवारी नेसलेल्या बायका, दशावतार, ओरिजन्स ऑफ कलर्स याविषयी इंद्रजित खांबे आणि अभय कानविंदे या छायाचित्रकारांनी माहिती दिली.

सोलो प्रवास करणाऱ्या आभा चौबळ यांनी त्यातील गमती जमती, भेटलेली माणसे, भन्नाट अनुभव, या प्रवासाने काय दिले अशा विविध बाबी उपस्थितांना सांगितल्या. तन्मय देवचके यांनी रोजच्या आयुष्यात भारतीय कसे मिसळून गेले आहे, मेलडी म्हणजे काय, हार्मनी म्हणजे काय हे सर्व हार्मोनियमच्या माध्यमातून दाखवलं. तसेत त्याचा संपूर्ण बँड देखील होता.

यावेळी ग्रीहिथा सचिन विचारे या नऊ वर्षाच्या मुलीचा सन्मान करण्यात आला. ग्रीहिथा ही एव्हरेस्ट बेस कँप सर करणारी ती महाराष्ट्रातील दुसरी आणि देशातील तिसरी सर्वात तरुण गिर्यारोहक आहे.

तसेच ग्रीहिथाने माउंट किलीमांजारो हा साउथ आफ्रिकेतील सर्वात उंच स्टॅँडअलोन डोंगर देखील मागच्या वर्षी सर केला आहे. ९ वर्षांच्या ग्रीहिथाने ८० हून अधिक मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. या चिमुकलीच्या धाडसाला कार्यक्रमातील उपस्थितांनी उभे राहून सलाम केला. तसेच स्वयं सुसंवादक डॉ. उदय निरगुडकर यांनी या सर्व वक्त्यांशी संवाद साधला.

हाऊसफुल्ल कार्यक्रम

मुंबईत झालेला हा कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. या क्रार्यक्रमासाठी मुंबईसह पुणे, रत्नागिरी, बंगळूरु अशा विविध ठिकाणांहून आलेले प्रेक्षक याला उपस्थित होते. राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तरुण विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी अविनाश नारकर, इला भाटे, ऐश्वर्या नारकर, सॉफ्टवेअर क्षेत्रातील उद्योजक नरेंद्र काळे, दीपक घैसास , सुनील बर्वे अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली. तसेच ‘माइम’, किस्सा गोई या वेगळ्या कलाप्रकाराच्या माध्यमातून वक्त्यांची ओळख करुन देण्यात आली.

तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभांगी भुजबळ यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन हे नविन काळे व आशय महाजन यांनी केले. या कार्यक्रमाची पुढील वाटचालीविषयी माहिती देतानाच ‘स्वयं टॉक्स फाउंडेशन’ ची घोषणा करण्यात आली. तसेच या समारोपाच्या प्रसंगी स्वयंच्या संपूर्ण टीमने उपस्थितांना मानवंदना दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT