Shivshahi bus, accused Dattatray Gade, arrested 
मुंबई/पुणे

Swargate case : मोठी बातमी! स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक

Pune Swargate shivshahi Case : शिवशाहीमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता गाडे याला पोलिसांनी शिरूरमधील त्याच्या गावातून अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Namdeo Kumbhar

स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता नराधम दत्ता गाडे याने फलटणला जाणाऱ्या तरूणीसोबत बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. पुणे पोलिसांची १३ पथके दत्ता गाडे याला पकडण्यासाठी तैणात होती. मध्यरात्री एक ते दोन वाजेदरम्यान पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला अटक केली. (Swargate Shivshahi Rape Case: Accused Dattatray Gade Arrested, Police to Seek 14-Day Custody)

स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता रामदास गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. गाडेला रात्रीच्या सुमारास लष्कर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याच्या गावातून अटक केली. दत्ता गाडे याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी रात्री एक वाजता बेड्या ठोकल्या. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजता पुणे पोलीसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस स्टेशनला दाखल झाले. ⁠आरोपी दत्ता गाडे याला रात्री लष्कर पोलीस ठाण्यात ठेवणार आहेत. ⁠आज दुपारी तीन नंतर आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन च्या टीमने आरोपीला अटक केले.

आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने गाडे याला त्याच्या गावातून त्याला अटक केली आहे. आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनच्या लॅाकअपमध्ये ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त, झोन २ स्मार्तना पाटील यांनी दिली. दत्ता गाडे याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे, १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT