Jitendra Awhad Jeep Attacked near Thane SAAM TV
मुंबई/पुणे

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या जीपवर हल्ला; संभाजीराजे छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप, कुणी घेतली हल्ल्याची जबाबदारी? VIDEO

Jitendra Awhad Jeep Attacked: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीपवर हल्ला करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संतापलेल्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या जीपवर हल्ला केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांची जीप ठाण्याकडे येत असतानाच स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आला. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काय म्हणाले होते आव्हाड

विशालगडावर जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजीराजे छत्रपती आहेत.११ वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरील घुमट तोडला जातो.दरोडेखोर घुसावे त्याप्रमाणे ते प्रवेश करताता आणि तोडफोड करतात. ही तोडफोड शंभर टक्के संभाजीराजेंमुळे झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांच्या विधानाविरोधात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे येत असताना त्यांच्या जीपवर स्वराज्य संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आव्हाड यांच्या जीपच्या पाठीमागे पोलिसांची कार होती.

स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येताच बरोबर पोलीस कर्मचाऱ्यांनी कार थांबवली आणि आव्हाडांच्या कारकडे धावले. परंतु पोलीस पोहोचेपर्यंत कार्यकर्त्यांनी आव्हाडाच्या कारवर दगड, लाठ्या काठ्याने हल्ला करत पळ काढला.

नाना पटोले यांची टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या जीपवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यात आमदार देखील सुरक्षित नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे सगळं घडत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT