Toothbrush Swallowed saam tv
मुंबई/पुणे

Toothbrush Swallowed: सकाळी दात घासताना थेट टूथब्रश गिळला! ५० वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने डॉक्टरही चक्रावले

Man Swallows Toothbrush: रायगडमधील पेण येथे ५० वर्षीय व्यक्तीने दात घासताना चुकून संपूर्ण टूथब्रश गिळला. नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे कोणतीही शस्त्रक्रिया न करता टूथब्रश बाहेर काढला. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी दात घासताना अनेकदा आपण घाई करतो. मात्र याच घाईत रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत धक्कादायक घटना घडलीये. दात घासत असताना 50 वर्षीय राजेंद्र मालुसरे यांनी चुकून संपूर्ण टूथब्रशच गिळल्याची घटना घडलीये. यामुळे टूथब्रश थेट त्यांच्या पोटात अडकला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुख्य म्हणजे नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या मदतीने हा टूथब्रश बाहेर काढला. वेळेत उपचार मिळाल्याने राजेंद्र यांची प्रकृती आता ठीक असून, काही तासांतच त्यांना घरी सोडण्यात आले.

नेमकं काय घडलं?

राजेंद्र मालुसरे हे पेणमध्ये राहतात आणि ऑटो रिक्षा चालवण्याचं काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत असताना त्यांच्या हातून चुकून संपूर्ण टूथब्रश गिळला गेला. टूथब्रश थेट पोटात गेल्याने ते घाबरले. त्यानंतर त्यांनी जवळच्या एका डॉक्टरांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. ही घटना ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं.

डॉक्टरांनी त्यांना एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. मात्र, टूथब्रश प्लास्टिक आणि फायबरचा असल्याने एक्स-रेमध्ये तो स्पष्टपणे दिसला नाही. त्यामुळे पुढील तपासणी आणि उपचारांसाठी राजेंद्र यांना नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात पाठवण्यात आलं.

शस्त्रक्रिया न करता टूथब्रश बाहेर काढला

मेडिकव्हर रुग्णालयात राजेंद्र यांची एंडोस्कोपीद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत संपूर्ण टूथब्रश त्यांच्या पोटात अडकल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. कोणतीही शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या मदतीने राजेंद्र यांच्या पोटातील टूथब्रश बाहेर काढण्यात आला.

वेळेत उपचार मिळाल्यामुळे राजेंद्र यांना मोठ्या धोक्यातून वाचवणं शक्य झालं. उपचार पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

Maharashtra News Live Update : 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी 5000 जमा

अंबानींवर ED ची मोठी कारवाई! तब्बल ५१० कोटींच्या मालमत्तेवर टाच; २ खासगी विमानेही जप्त

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांची नावे वगळली! दुष्काळग्रस्त महिलांचा मुंबईत एल्गार; १,५०० रुपये पुन्हा सुरू करण्याची मागणी

Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप

Pune : पुणे पोलीस दलात खळबळ! आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित

SCROLL FOR NEXT