Devendra Fadnavis-Sushma Andhare Saam TV
मुंबई/पुणे

Sushma Andhare News: 'फडणवीस काडतूस तर ठाकरी बाणा म्हणजे तोफ...' ठाण्याच्या सभेतून सुषमा अंधारे कडाडल्या; बावनकुळेंना दिले थेट आव्हान

Maharashtra Politics: ठाकरे गटाकडून ठाणे पोलिस आयुक्तालयावर महामोर्चा काढण्यात आला होता.

Gangappa Pujari

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...

Thane News: ठाण्यात (Thane) ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. या मारहाणीनंतर ठाकरे गटाकडून ठाणे पोलिस आयुक्तालयावर महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

ठाण्यामध्ये ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्चाची ठाणे पोलिस आयुक्तालयासमोर सांगता झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे...

"रोशनी शिंदे एका सोशल मीडियाच्या पोस्टवर काहीतरी कमेंट करते. प्रकरण चिघळत जातं. बायका तिच्यापर्यंत पोहोचतात. तिला धमकवतात. ती माफी मागते. त्यानंतर तिला माफीचा व्हिडीओ तयार करायला सांगितला जातो. त्यानंतरसुद्धा तिच्या पोटात लाथा मारल्या जातात."

"काही माध्यमांनी काल असं म्हटलं की, सदर महिला ही गरोदर नाही. ती महिला गरोदर नसेल तरी पोलीस, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की, एखादी मायमाऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथा मारण्याचं परमीट तुम्हाला मिळतं का? तुम्ही उत्तर द्या”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

बावनकुळेंना दिले थेट आव्हान...

मुख्यमंत्र्यांना फडतूस म्हणू नये मान्य मग दादा, भाऊ म्हटल्यावर तुमचे आमदार आम्हाला शिवीगाळ करतात, तर आम्ही काय करणार?, असे सुषमा अंधारे म्हणाले. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना महाष्ट्रात फिरु देणार नाही, या चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) वक्तव्याचा देखील सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. "बावनकुळे यांच्यात हिंमत असेल तर त्यानी ४८ तासात मातोश्रीवर यावे," असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले.

तसेच जर तुम्ही काडतूस आहात. तर ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे आणि तोफेपुढे काडतुसाचा निभाव लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करुन ठाकरेंसाठी उभा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४ वर्ग, एक खोली अन् एकच शिक्षक... जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची बिकट अवस्था!

Flax Seeds Laddu Recipe : हिवाळ्यात सांधेदुखी होईल दूर, रोज खा जवसाचा पौष्टिक लाडू

Jowar Khichdi Recipe: डाईट सुरु केला आहे पण टेस्टी खायची इच्छा होते? मग रात्री घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी ज्वारीची खिचडी

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

New Marathi Serial : "प्रेम की पैसा..."; 'झी मराठी'वर सुरू होणार नवीन मालिका, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

SCROLL FOR NEXT