Kishor Jorgewar Mother : मुलगा आमदार असतानाही ८० वर्षीय आई विकतेय बांबूच्या टोपल्या; साधेपणा पाहून थक्क व्हाल!

Gangubai Jorgewar : गंगुबाई जोरगेवार (वय ८० वर्ष) असं या माऊलीचं नाव असून त्या चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आहेत.
Mla Kishor Jorgewar Mother Gangubai Jorgewar News
Mla Kishor Jorgewar Mother Gangubai Jorgewar NewsSaam TV
Published On

Mla Kishor Jorgewar Mother News : आमदार, खासदार म्हटलं की, डोळ्यासमोर येतं विधानसभा आणि लोकसभेतलं चित्र. जनतेने निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी विकासासाठी धडपड करत असतात. जनतेची कामे करताना जीवाला धोका असल्यामुळे आमदार-खासदार यांच्यासह त्यांची कुटुंबियांना देखील खास सुरक्षा दिलेली असते. पण आजही काही आमदार असे आहेत, की जे सुरक्षा नाकारतात. (Breaking Marathi News)

Mla Kishor Jorgewar Mother Gangubai Jorgewar News
Narayan Rane News : उद्धव ठाकरेंना अटक होणार? नारायण राणे काय म्हणाले, वाचा...

त्यांचे कुटुंबिय सुद्धा अगदी सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून घेतात. एखादा व्यवसाय सुरू करून जनतेत राहणं पसंत करतात. अशाच एका आमदाराच्या माऊलीने सर्वसामान्यांची मने जिंकून घेतली आहे. मुलगा आमदार असून ही माऊली आई महाकाली देवीच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकतेय. (Latest Marathi News)

गंगुबाई जोरगेवार (वय ८० वर्ष) असं या माऊलीचं नाव असून त्या चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आहेत. गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार मागील पन्नास वर्षांपासून चंद्रपुरात बांबूपासून बनवलेल्या ताटवे टोपल्या विकत आहेत. चंद्रपूरच्या घनदाट वस्तीत गेली पन्नास वर्षे नेटाने हाच व्यवसाय करणाऱ्या अम्मा जोरगेवार यांनी यंदा देखील देवी महाकाली यात्रेत थेट फुटपाथवर आपला व्यवसाय थाटलाय.

Mla Kishor Jorgewar Mother Gangubai Jorgewar News
Samruddhi Highway Accident : अतिवेग जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मुलगा आमदार असला तरी, तीच घासाघीस, तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्याचा प्रयत्न. वार्धक्य आले तरी आणि मुलगा लोकप्रतिनिधी झाला तरी गंगूबाईंची व्यावसायिक धडपड सुरू आहे. पारंपरिक व्यवसाय करण्यात काय लाजायचे? कष्टाने समाधान मिळत असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे आमदार आणि गंगुबाई जोरगेवार यांचे सुपुत्र किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

बांबू ताटवे, टोपल्या यांचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत. तेच श्रम- तोच व्यवसाय- तेच कष्ट आणि तोच आनंद मिळवत आहे. आपल्या आईला व्यवसायाच्या ठिकाणी दमदार गाडीतून सोडणाऱ्या किशोर जोरगेवार यांना या श्रमाचाही प्रचंड अभिमान आहे, असं जोरगेवार यांनी म्हटलं आहे. याच भूमीतले ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांनी "श्रम ही है श्रीराम हमारा" हा नारा दिला होता. हाच मंत्र तंतोतंत लागू होत असलेल्या गंगुबाई जोरगेवार यांच्या या कार्याला सलाम.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com