वरळी सीफेसच्या जागेला करोडोचा भाव! चक्क व्यापाऱ्याने बंगल्यासाठी मोजले करोडो wikipedia
मुंबई/पुणे

वरळी सीफेसच्या जागेला करोडोचा भाव! चक्क व्यापाऱ्याने बंगल्यासाठी मोजले करोडो

साम टिव्ही ब्युरो

मुंबईतील जागेला सोन्याची किंमत होतीच. परंतू आता हिऱ्याची किंमत आली असे म्हणायला काही एक हरकत नाही. यामध्ये विशेषकरून मध्य मुंबईचा (Mumbai) उल्लेख करावा लागेल. मध्य मुंबईतील वरळी भागातील जागांचे दर आता सर्वसामान्यांच्या हाताच्या बाहेर गेले आहेत. वरळी सी-फेसजवळील जागांची किंमत आता प्रति चौरस फूट 93 हजार रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. हिरे उद्योगातील प्रसिद्ध नाव ‘हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड’ (Hari Krishna Exports) या कंपनीने वरळी सी-फेसजवळील एक बंगला 185 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. (Surat diamond merchand bought bungalow worth Rs 185 crore)

‘पन्हार बंगलो’ असे या बंगल्याचे नाव आहे. या बंगल्याला तळघर, तळमजला आणि वर सहा मजले असून या मालमत्तेचा 30 जुलै रोजी व्यवहार झाला आहे. 93 हजार रुपये चौरस फुटाने ही मालमत्ता विकत घेतली आहे. संबंधीत जागा आतापर्यंत एस्सार समूहाच्या आर्पे होल्डिंग्ज लिमिटेडच्या मालकीची होती. या बंगल्याचे क्षेत्रफळ 1349 चौरस मीटर आहे.

हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड ही कंपनी सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी घनश्यामभाई धनजीभाई ढोलकिया यांच्या मालकीची आहे. घनश्यामभाई ढोलकिया यांचे पुत्र सावजी ढोलकिया या कंपनीचा संपुर्ण कारभार पाहतात. सावजी हे दानशूर मालक म्हणून प्रसिद्ध आहेत. 2018 मध्ये त्यांनी आपल्या तीन सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांना चक्क मर्सिडीज कार बक्षीस स्वरुपात दिल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी आपल्या कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 500 फ्लॅट्स आणि हिऱयांचे दागिने भेट दिले होते.

कागदपत्रे पाहिली तर ‘पन्हार बंगलो’ ही मालमत्ता आतापर्यंत अनेकांच्या मालकिची राहिली आहे. 13 ऑक्टोबर 1941 रोजी पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेने हा बंगलो असलेली जमीन वार्षिक 1 रुपया भाडेतत्त्वावर कुबालया राज यांना दिली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT