Supriya Sule and ajit pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule On Ajit Pawar: अजित पवार नाराज आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

राजकीय वर्तुळातील चर्चांवर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

Supriya Sule News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली. शरद पवारांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच कालच्या निर्णयानंतर अजित पवार नाराज झाले आहेत, अशीही चर्चा सुरु आहे. या राजकीय वर्तुळातील चर्चांवर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मी पक्षाचे सगळे कार्यकर्ते, नेते, शरद पवार यांचे आभार मानते की, एवढा विश्वास माझ्यावर टाकला. मी प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. तर राज्यात अजित पवार, छगन भुजबळ यांना रिपोर्ट करणार आहे. राष्ट्रवादी हा लोकशाहीचा पक्ष आहे. त्यामुळे यात रिपोर्टिंगचा विषय येत नाही.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शरद पवार यांच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांचे कुठले कार्यकर्ते आग्रही होते? तुम्हाला गॉसिप करायचे आहे, पण मला सत्य मान्य आहे. राष्ट्रवादी पक्ष लॉबिंगने चालत नाही. विरोधीपक्षनेत्याचं पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने असते'.

घराणेशाहीवर भाष्य करताना सुळे म्हणाल्या...

घराणेशाहीच्या प्रश्नावर उत्तर देताना सुळे म्हणाल्या, 'घराणेशाही असली तर मला मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घराणीशाहीची टीका करणाऱ्यांच्या पक्षातील घराणेशाहीची यादी अनेकवेळा संसदेत वाचून दाखवली'.

'माझ्याकडे बोटे दाखवत आहेत, मात्र चार बोटे तुमच्याकडेही आहेत हे लक्षात ठेवा. शरद पवार यांची मुलगी असली म्हणून मला उत्कृष्ठ संसदपटूचा पुरस्कार मिळत नाही. त्यासाठी माझे कामही महत्वाचे आहे, असेही पुढे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताईं ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

Maharashtra Live News Update: नाशिकमधील वाघाडी नाला फुटला; गोदाघाट परिसरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT