Supriya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

माझ्या घरावरील हल्ला दुर्दैवी - सुप्रिया सुळे

शांततेच्या मार्गाने म्हणणे मांडत असाल तर मी बोलायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या संतप्त एसटी कर्मचाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे सामोऱ्या गेल्या. शांततेच्या मार्गाने म्हणणे मांडत असाल तर मी बोलायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे देखील पहा -

सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. शांत राहा, माझी तुमच्यासोबत बोलण्याची तयारी आहे, असं सुप्रिया सुळे वारंवार सांगत होत्या. मात्र, तरीही आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. तुम्ही शांत बसले तर मी पुढच्या क्षणी बोलणी करण्यास तयार आहे. आईवडील आणि मुलीला भेटून येऊ द्या. मी तुमच्याशी बोलते, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांना केली.

यावेळी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही आंदोलक कर्मचारी हे शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत होते.

माझी आई आणि मुलगी घरात आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करू द्या. त्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी शांततेच्या मार्गाने संवाद साधायला तयार आहे,अशी विनंता सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. काही आंदोलकांनी घरावर चपला फेकल्या. यानंतर सुप्रिया सुळे या आंदोलकांना सामोऱ्या गेल्या. यावेळी त्यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई पोलिसांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी जे माझ्या आईवडील आणि मुलांसाठी केले, त्यासाठी मी आभार मानते. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात हे असं पहिल्यांदाच घडलं आहे. माझी आंदोलकांना हात जोडून विनंती आहे. माझी चर्चेची तयारी आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात, असेही त्या म्हणाल्या. माझ्या घरावर हल्ला झालाय हा दुर्दैवी आहे, असं सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT