Supriya Sule Saam tv
मुंबई/पुणे

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

Supriya Sule car Accident : सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने धडक दिली.

Vishal Gangurde

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात

अपघातानंतर पोस्ट करून दिली माहिती

कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती सुळेंनी दिली

पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आज शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रवास करताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कारमधील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करून दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे या आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. साताऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पुणे मार्गाने मुंबईला परतत होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून मुंबईतील निवासस्थानी परतत होत्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर जाताना त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांनी तातडीने व्हॉट्सअॅप स्टेट्‍सवर अपघाताविषयी माहिती पोस्ट केली. 'मी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे सुरक्षित आहे. एका मिनिटासाठी भीती वाटली होती, असेही त्यांनी माहिती दिली. महामार्गावर पाठिमागून येणाऱ्या कारने धडक दिल्याची माहिती त्यांनी दिली. कारमधील सर्व जण सुखरूप असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत काय म्हटलं?

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, 'पुण्याहून मुंबईकडे प्रवास करताना महामार्गावर वाईट अनुभव आलाय. GJ13CF5257 या कारने वेगात माझ्या कारला पाठीमागून धडक दिली. वेगवान आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे रस्त्यावर दुसऱ्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना विनंती करते की, सीट बेल्टचा वापर करावा, सतर्क राहा. जबाबदारीने वाहन चालवा. जेणेकरून महामार्ग सर्वांसाठी सुरक्षित राहील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT