Supreme Court Assembly Speaker Notice Rahul Narvekar on Mla Disqualification Saam Tv
मुंबई/पुणे

Supreme Court Assembly Speaker Notice: १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

16 MLA Disqualification Notice Update: आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Maharashtra MLA Disqualification Notice: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सु्प्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन नोटीस बजावली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात या नोटीशीचे उत्तर द्या, असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने साधारण अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

मात्र, या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यासंदर्भात जाणून बुजून उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली होती.

दरम्यान, यावर आज ( १४ जुलै ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दोन आठवड्यांत आपले उत्तर सादर करावे, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बजावली आहे.  एकीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताच विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील (शिंदे आणि ठाकरे) आमदारांना नोटीस पाठवली आहे.

या आमदारांना (16 MLA Disqualification) अपात्र का केले जाऊ नये असे विचारत ७ दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे. लेखी उत्तर आले नाही तर विधानसभा अध्यक्ष आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळाला शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. त्यावर तसेच आमदारांनी दिलेल्या पुराव्यांआधारे नार्वेकर निकाल देणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

SCROLL FOR NEXT