'चित्रपटात ते कलाकार होते नथुराम नव्हे;' शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण
'चित्रपटात ते कलाकार होते नथुराम नव्हे;' शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण Saam TV
मुंबई/पुणे

'चित्रपटात ते कलाकार होते नथुराम नव्हे;' शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केलेल्या नथुराम गोडसेंच्या भुमिकेवरुन वाद सुरु झाला असताना आता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) अमोल कोल्हेंचं समर्थन केलं आहे. चित्रपटामध्ये ते कलाकार होते नथुराम नव्हते, कोणत्याही कलाकाराकडे कलाकार म्हणून बघीतलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले आहेत.

शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामधील संघर्ष दाखवताना कोणी शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो कोणी औरंगजाबाची याचा अर्थ औरंगजेब साकारणारा मोगली साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. त्याचप्रमाणे अमोल कोल्हेंनीनी कलाकार म्हणून काम केलं गोडसें म्हणून नव्हे. आपणं त्यांच्याकडे एक कलाकार म्हणूनच पहायला हवं असं शरद पवार म्हणाले आहेत.

'जसं राम-रावणांच्या संघर्षात रावणाची भूमिका साकारणारा व्यक्ती प्रत्यक्ष रावण नसते ती कलाकार असते तसेच अमोल कोल्हेंनी केलेली भुमिकेकडे आपण कलाकार म्हणून पाहायला हवं. शिवाय त्यांनी ही भूमिका केली त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते असही पवार म्हणाले.

दरम्यान कोल्हेंनी कलावंत म्हणून त्यांनी भुमीका केली म्हणजे ते गांधीविरोधी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजप वरती निशाना साधला भाजप गांधीवादी कधीपासून झाला असा टोलाही त्यांनी भाजपवरती यावेळी लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT