Sunetra Pawar : Saam tv
मुंबई/पुणे

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार? प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचा पत्ता कट

Sunetra Pawar News : प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं निश्चित मानलं जात आहे. तसेच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभेवर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार या गुरुवारी राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, हे दुपारी बारा वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

राज्यसभेचा रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारिख आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाच्या मिळाल्यास प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. प्रफुल पटेल हे कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मिळत असल्याने त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी महायुतीमधील शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांनी शपथ घेतली होती. शपथविधीच्या सोहळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील ६ जणांनी शपथ घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

गाव हादरलं! जनावरांच्या गोठ्यात सापाच्या पिल्लांचा सापळा; एकाच ठिकाणी आढळली ६० नागाची पिल्लं

SCROLL FOR NEXT