baramati  Saam tv
मुंबई/पुणे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

baramati bypoll : बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अर्ज भरतील. तर काँग्रेसनेही या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिलाय. मात्र, काँग्रेसने माघार घेण्यासाठी एक अट ठेवली आहे.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी

पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्यासाठी काँग्रेसने एक अट ठेवली आहे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सोमवारी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामती पोटनिवणुकीसाठी काँग्रेसनेही उमेदवार दिला आहे. काँग्रेसने रविवारी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी एक अट ठेवली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काही राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दुपारपर्यंत अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसचे आकाश मोरे देखील या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. या पोटनिवडणुकीत अर्ज माघार घेण्यासाठी आकाश मोरे यांनी एक अट ठेवली आहे.

अॅड आकाश मोरे म्हणाले, पोटनिवडणूक ही लोकशाही टिकवण्यासाठी लढत असून आमचा मूळ शत्रू भाजप आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी अजित पवारांचा विमान अपघाताचा तपास देखील मुद्दा आहे. या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस निवडणूक लढवत आहेत. अजित पवार अपघात प्रकरणात गुन्हा दाखल केल्यास उमेदवारी माघारी घेण्यास तयार आहोत'.

रोहित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या काय पोस्ट केली?

आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. 'बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी पवार या आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताहेत. ही पोटनिवढणूक बिनविरोध व्हावी, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे', असे रोहित पवार म्हणाले.

'आमची विनंती ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशी पोस्ट रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

School News: पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप बसणार; शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Mumbai : मुंबईकरांना पाणीटंचाईची झळ बसणार? पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणात किती टक्के पाणीसाठा उरलाय? माहिती समोर

SCROLL FOR NEXT