laxman hake news  Saam tv
मुंबई/पुणे

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत मोठी खेळी;बलाढ्य नेत्याची पोटनिवडणुकीतून माघार

laxman hake news : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीत मोठी खेळी खेळली आहे. या पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादीच्या विनंतीनंतर लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे.

Vishal Gangurde

बारामतीत राष्ट्रवादीची मोठी खेळी

बारामती पोटनिवडणुकीतून बड्या नेत्याची माघार

हाकेंनी माघार घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसचे आव्हान

सचिन जाधव, साम टीव्ही

बारामतीमधील पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सोमवारी अर्ज भरणार आहेत. बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी ओबीसी लक्ष्मण हाके यांनी डाव टाकला होता. परंतु राष्ट्र्वादी काँग्रेसने विनंती केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे. हाके यांनी माघार घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेस उमेदवाराचे आव्हान असणार आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला मंत्री दत्ता भरणे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विनंतीनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

लक्ष्मण हाके म्हणाले, 'आम्ही बारामतीत काही प्रश्नाबाबत निवडणुकीत उतरणार होतो. ओबीसी नेता म्हणून मी लढत होतो. मी विद्रोही आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री उदय सामंत, मंत्री भरणे मामा यांनी मला विनंती केली. राज्यात माझे प्रश्न मांडत राहील. लोकांची सहानुभूती आहे. अनेक मागण्या आहेत. १८ महामंडळ सांगितले आहेत. त्याला अजून अध्यक्ष नाही, कार्यालय नाही, बजेट नाही. सुनेत्रा पवार यांचा कॉल आला. एवढ्या सगळ्यांचे फोन आले. त्यामुळे मी ठरवले की, आपण थांबायला पाहिजे. आमच्या मागण्याबाबत मी समाधानी नाही. मी मागण्यांवर कायम ठाम आहे'.

मंत्री भरणे काय म्हणाले?

मंत्री दत्ता भरणे म्हणाले, 'बारामती पोटनिवडणूक होत आहे. राज्याचे अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार लढवत असताना ती बिनविरोध व्हावी, त्यासाठी लक्ष्मण हाके यांना विनंती करत आहे. चर्चा केल्यानंतर आता का निवडणूक बिनविरोध होणे का गरजेचे आहे, हाके यांना सांगितले. लक्ष्मण हाके सर चांगल्या भूमिकेला पाठिंबा देतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT