sunetra pawar ncp  Saam tv
मुंबई/पुणे

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार?

Sunetra pawar ncp News: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संजयकाका पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता

संजयकका पाटील यांच्यानंतर आणखी एका राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा

राष्ट्रवादी दोन नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतरही पक्ष फुटीचं सत्र सुरू आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचे ६ खासदार फुटले. ६ खासदारांच्या फुटीने राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. फुटीर खासदार शिंदे सेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शिंदेंची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटील भाजपच्या वाटेवर आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. या नेत्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल मतदान पार पडलं. राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी पक्षाची साथ देखील सोडली. या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतरही नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्येही नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, अल्पसंख्याक समाजातील नेते सलीम सारंग यांच्याही नाराजीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. सलीम सारंग हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सलीम सारंग यांचा अल्पसंख्याक समाजात चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यांनी पक्षाची साथ सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पसंख्याक मतदारांमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजयकाका पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार

सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. संजयकाका हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत येत्या ३० जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

Sunil Grover: फुटपाथवर झोपलेला दिसला प्रसिद्ध अभिनेता; व्हिडिओ पाहून चाहते हैरान, म्हणाले, 'अहंकार नसल्यावर...'

मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, जीएसटी विभागात खळबळ

Maharashtra News Live Update: दोडामार्ग विर्डी धबधब्याच्या खोल जलकुंडात पर्यटक बुडाला

SCROLL FOR NEXT