Sujat Ambedkar Saam TV
मुंबई/पुणे

"हनुमान चालीसा म्हणायला जाणाऱ्यांनी जानवं दाखवावं, बहुजनाचा एकही पोरगा तिथं नको"

'माझी राज ठाकरे यांना विनंती आहे तो भोंगा लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल घोषणा केली की मशिदीसमोर भोंगे लावा माझी राज ठाकरे यांना विनंती आहे तो भोंगा लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा. एकही बहुजन जाता कामा नये. घोषणा तूम्ही करणार कार्यकर्ता त्यात भरडला जाणार. मला एकच सांगा तूम्ही अमित ठाकरे यांना पाठवणार का? असा सवाल उपस्थित करत सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते एटीआय येथील वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) कार्यालयाजवळ आयोजित केलेल्या राजकीय सभेत बोलत होते.

जर राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर पोलिसांना माहिती आहे की पकडायचं कुणाला. राज ठाकरे यांनी म्हटल मुस्लिमानी भोंगे लावले तर मी पोरांना भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणायला लावेल. माझा राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा 100 टक्के पाठींबा आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना तिकडे हनुमान चालीसा म्हणायला पाठवा. मला एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे. जितकी पोरं हनुमान चालीसा म्हणायला जाणार आहेत त्यांनी शर्ट काढून जानवं दाखवा एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे.

हे देखील पहा -

दरम्यान यावेळी ते कार्यकर्त्यांसमोर म्हणाले, तुमच्या समोर आल्यामुळे मला प्रचंड ताकद मिळाली. मी बऱ्याच दिवसांपासून आज बोलतं आहे. आपली ताकद काल होती तशीच आजही आहे. आपली ताकद कमी होणारं नाही. मागच्या निवडणुकांपासून परिस्थिती बदलली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जना गरजेचं आहे. लाटेवर जायचं नाही कारण नरेंद्र मोदी (Narendra Modi) सुद्धा लाटेवर पंतप्रधान झाले आहेत. मागच्या 2 निवडणूका लढताना लक्षात आलं आहे की आपण स्वबळावर निवडणुक लढू शकत नाही. आता आपण आपला समाज सोडून इतर समाजाच्या लोकांना आपल्या पक्षाशी जोडायचं आहे असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT