Sujat Ambedkar Saam tv
मुंबई/पुणे

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Sujat Ambedkar on RSS : सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. ते संविधान सन्मान सभेत बोलत होते.

Vishal Gangurde

वंचित बहुजन आघाडीकडून मुंबईत संविधान सन्मान सभेचे आयोजन

सुजात आंबेडकरांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत नसल्याची सुजात यांची टीका

वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा आणि संविधानाला मानत नाही. त्यांचा संघ पब्लिक रजिस्ट्रेशन अॅक्ट देखील मानत नसल्याचा आरोपही सुजात आंबेडकर यांनी केला. ते मुंबईतील संविधान सन्मान महासभेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर 'संविधान सन्मान महासभा' आयोजित केली. या सभेत प्रंचड गर्दी झाली. या सभेत सुजात आंबेडकर यांनी थेट आरएसएसला लक्ष्य केलं.

महासभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) थेट आव्हान म्हटलं की, या देशात राहायचे असेल, तर RSS ला संविधान मानावे लागेल. भाजप, RSS आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आणि केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच आहे. वंचित बहुजन आघाडी हा RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढणारा पहिला राजकीय पक्ष आहे'.

शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

मुंबईच्या शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या 'संविधान सन्मान महासभेला' संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. शिवाजी पार्क मैदान भरून गेल्याचे दिसून आले. यावेळी सुजात आंबेडकर यांनी संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

सभा घेण्यामागचे कारण काय?

संविधानाचा मसुदा (Draft) तयार झाला, त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण झालं होतं. वंचित बहुजन आघाडीकडून त्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे परत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी ही महासभा २५ नोव्हेंबरला आयोजित केली जाते. संविधान सभेचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी ही सभा आयोजित करण्याचा संकल्प वंचितने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

SCROLL FOR NEXT