"राज्य सरकारने किन्नरांना आश्रम उभारून द्यावे"- कल्याण-डोंबिवली मधील तृतीयपंथीयांची मागणी प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

"राज्य सरकारने किन्नरांना आश्रम उभारून द्यावे"- कल्याण-डोंबिवली मधील तृतीयपंथीयांची मागणी

इतर राज्यांप्रमाणे राज्य सरकारने देखील किन्नरांना आश्रम उभारून द्यावे अशी मागणी कल्याण-डोंबिवली मधील तृतीयपंथीयांची केली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली:  देशाभरतील पाच राज्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी आश्रम हे शासनाने शासनाच्या जागांवर उपब्ध करून दिले आहेत. त्याच धर्तीवर आम्हाला देखील शासनाने आश्रम उपलब्ध करून द्यावे अशी मागणी किन्नर अस्मिता या संस्थेच्या अध्यक्षा तमन्ना केणे यांनी केली आहे. भिक न मागता आम्ही देखील मेहनत करून विविध प्रकारच्या वस्तू तयार करत आहोत. आम्हाला गरज आहे ती शासनाच्या आणि समाजाच्या सहकार्याची असं त्यांनी सांगितलं आहे. (State government should set up an ashram for kinnars demands of kinnars from Kalyan-Dombivali)

हे देखील पहा -

या आधी देखील तृतीयपंथींनी रक्षाबंधनाला राख्या, विविध प्रकारचे साबण, कापडी वस्तू तयार केलेल्या होत्या. मात्र नागरिकांचे हवे तसे सहकार्य मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने आम्हाला मॉल्समध्ये आरक्षित जागा द्याव्यात जेणेकरून आम्ही तेथून आमचे प्रोडक्ट्स विकत जाऊ असं किन्नर अस्मिता संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी आर्थिक गैरसोय निर्माण झाली असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडून डोंबिवली शहर संघटक योगेश पाटील हे एक लाख रुपयांचा धनादेश घेऊन किन्नर अस्मिता संस्थेमध्ये पोहचले होते. यावेळी उप जिल्हा सचिव अनंत म्हात्रे, शहर संघटक तकदीर काळण, शहर सचिव अजून जांभळे, विभाग अध्यक्ष रक्षित गायकर, रोहित भोईर, सुनील राणे, शाखा अध्यक्ष सचिन म्हात्रे, योगेश चिकनकर, संदीप म्हात्रे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.                  

किन्नर समाजाने स्वावलंबी व्हावं यासाठी आवश्यक असा पाठपुरावा मनसेचे आमदार राजू पाटील करतील अस आश्वासन योगेश पाटील यांनी सांगितलं आहे. तर किन्नर समाजाने स्वावलंबी व्हावं यासाठी लवकरच एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार तसेच हेल्द इशू साठी नाहर हॉस्पिटल द्वारे मदत करू असे अरुण जांभळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या किन्नर समाज आता व्यवसायाकडे वळला आहे. फक्त त्यांनी समाज आणि शासनाच्या मतदीची अपेक्षा समोर ठेवली आहे. त्यामुळे यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का हे पाहावे लागेलं. 

कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण मलंगगड रस्त्याची पाहणी मागील आठवड्यात केली होती. यावेळी द्वारली येथील किन्नर अस्मिता या संस्थेच्या आश्रमाला भेट दिली होती. यावेळी या आश्रमात असलेल्या तृतीयपंथीयांनी आपल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आणि इतर सोयीसुविधासाठी आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे तमन्ना केणे यांनी सांगितले होते. या नंतर तातडीने शनिवारी दसऱ्याच्या निमित्ताने मनसेनेचे आमदार राजू पाटील यांनी एक लाखाचा चेक या संस्थेला सुपूर्त केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT