मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त, आम्ही त्यांच्या सोबत - थोरातांकडून ठाकरेंची पाठराखण

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भुमिका रास्त असून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत असं वक्तव्य साम टिव्हीशी बोलताना केलं आहे.
मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त, आम्ही त्यांच्या सोबत - थोरातांकडून ठाकरेंची पाठराखण
मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त, आम्ही त्यांच्या सोबत - थोरातांकडून ठाकरेंची पाठराखणSaam Tv News

मुंबई: काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. याला भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. कॉंग्रेसनं मात्र मुख्यमंत्र्यांची भुमिका रास्त ठरवली आहे. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भुमिका रास्त असून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत असं वक्तव्य साम टिव्हीशी बोलताना केलं आहे. (The stand of the Chief Minister is right, we are with him said balasaheb Thorat)

हे देखील पहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात केंद्र सरकार हे भारताच्या संघराज्य पद्धतीवर हल्ला करत असून राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी ही वस्तुस्थिती असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या विधानाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, "आपल्याला राज्यघटनेच्या बरोबर आपण चाललं पाहिजे. संघराज्य ही पद्धत आपण स्वीकारली आहे. केंद्राचे अधिकार राज्याचे अधिकार आहेत. परंतु आता सगळं वेगळं चाललंय. लोकशाहीच्या विरोधात काम सुरू आहे. भाजपच्या विरोधात लोक एकत्र येण्यापेक्षा जनतेने एकत्र यायला हवं, आपल्याला एकत्र येऊन लढा द्यायला हवा असं आव्हान त्यांनी केलं.

तसेच भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचे (भाजपचे) विचार आणि बाबासाहेबांचे विचार यात मूलभूत फरक आहे. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते, पुरोगामी चळवळीमध्ये नव्हते. ज्या मंथनातून राज्यघटना तयार झालेली आहे, समतेचा विचार आहे तिचा आणि भाजपचा दुरान्वयानेही संबंध नाही. आता फक्त ढोंग बोलण्याचं आहेत, मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त आहे आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत.

मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त, आम्ही त्यांच्या सोबत - थोरातांकडून ठाकरेंची पाठराखण
प्रसिद्ध 'तळवळकर्स जिम' विरोधात २०६ कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

विधानसभेतचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, त्यांनी काय म्हणण्यापेक्षा सरकार आमचं आलेलं आहे, आणि बेईमानी कोणी केली हे मुद्दाम आपण मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विचारावं. कोणामध्ये बेईमानी आहे हे मुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेल आहे. आम्ही एकत्र आहोत जनतेच्या विचारा करता, त्यांच्या ताकदी करता, त्यांच्या जीवनामध्ये सामान्य आनंद निर्माण करण्याकरता आलोय आणि आम्ही काही चांगले काम करतोय असंही ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com