राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित अश्विनी जाधव- केदारी
मुंबई/पुणे

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

मुंबई - महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

हे देखील पहा -

निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे अथवा इतर कुठलाही व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

सन 2019-20 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. सुपे यांना अटक करून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT