St Worker Saam Tv
मुंबई/पुणे

ST Worker : 'त्या' निर्णयाविरोधात ST कंत्राटी चालकांचा संताप; थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार

९ महिने राज्य परिवहन महामंडळाला सेवा देऊनही ३ ऑक्टोबर रोजी कोणतिही पूर्व कल्पना अथवा नोटीस न देता ८०० कंत्राटी चालकांना कमी करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर राज्य परिवहन मंडळतील ८०० कंत्राटी चालकांनी (St Worker) पून्हा संपाचे हत्यार उपसले आहे. ९ महिने राज्य परिवहन महामंडळाला सेवा देऊनही ३ ऑक्टोबर रोजी कोणतिही पूर्व कल्पना अथवा नोटीस न देता ८०० कंत्राटी चालकांना कमी करण्यात आले. या निर्णयामुळे कंत्राटी चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

दिवाळीचा सण तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांना पगार अद्याप दिलेला नसताना अचानक पणे घेतलेल्या या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांनी मंत्रालयावर एल्गार लाॅग काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Latest News)

८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेत समाविष्ठ करून घ्यावे अशी मागणी या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणी साठी १७ ऑक्टोबर रोजी हा एसटी चालकांचा मोर्चा थेट मंत्रालयवर येऊन धडकणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ऐन सणासुदीच्या कालावधीत एसटी (ST Bus) कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. दोन महिन्याहून अधिक काळ हा संप चालल्याने राज्यातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

सरकारनं हा संप मिटवण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या आणि आश्वासनं दिली होती. मात्र, आता यावर्षी पुन्हा राज्य परिवहन मंडळतील ८०० कंत्राटी चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT