SSC- HSC re exams: दहावी, बारावीची फेरपरीक्षा होणार; अर्जासाठी कार्यक्रम जाहीर  Saam Tv
मुंबई/पुणे

SSC- HSC re exams: दहावी, बारावीची फेरपरीक्षा होणार; अर्जासाठी कार्यक्रम जाहीर

राज्य शिक्षण मंडळाकडून १० वी आणि १२ वीच्या फेरपरीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून State Board of Education १० वी आणि १२ वीच्या फेरपरीक्षेची re examination तयारी सुरू करण्यात आली आहे. याकरिता आज मंडळाकडून या २ परीक्षा पुढील काही महिन्यांमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुरवणी परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी असलेल्या, विद्यार्थ्यांकडून students परीक्षेसाठी Exam अर्ज भरण्याकरिता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

दहावी- बारावी SSC & HSC फेरपरीक्षा जुलै ते ऑगस्ट या कालावधी दरम्यान होणार आहे. परंतु यंदाच्या परीक्षेतसंदर्भात कार्यक्रम नंतर ठरवण्यात येणार असल्याचं मंडळाकडून यावेळी सांगण्यात आले आहे. दहावी- १२ वीच्या या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या, आयटीआय संस्थेव्दारे श्रेययांक न झालेले विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

हे देखील पहा-

यासाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ११ ते १८ ऑगस्ट या कालावधी मध्ये विनाशुल्क अर्ज भरता येणार आहे. तर विद्यार्थ्याना यासाठी आवश्यक असलेले शुल्क, ऑनलाईन पद्धतीद्वारे १९ ऑगस्ट दिवशी भरता येणार आहे. तर विलंब शुल्कासह २३ आणि २४ ऑगस्ट या कालावधी मध्ये अर्ज करता येणार आहे.

श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सन- २०२१ मध्ये श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादा संधी या परीक्षेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे परीक्षा शुल्क अदा केलेले असल्यामुळे फक्त अशाच विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तर नव्याने आवेदनपत्र भरणे, अनिवार्य असेल असे या मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT