Kalyan News  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमध्ये युवासेना शहर प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांविरोधात भाषण केल्याप्रकरणी कारवाई

Yuvasena City Head News : विना परवानगी मोर्चा काढल्या प्रकरणी नीरज कुमारसह अन्य काही जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News :

अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर २० तारखेला कोळशेवाडी पोलीस ठाण्यावर काढण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख नीरज कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांविरोधात भाषण करत पोलिसांवर टीका केली होती.

पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांविरोधात भाषण करणाऱ्या ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख नीरज कुमार यांच्याविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अप्रतीची भावना चेतवणे प्रकरणी 1922 कलम ३ अन्वये नीरज विरोधात तसेच विना परवानगी मोर्चा काढल्या प्रकरणी नीरज कुमारसह अन्य काही जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत नीरज कुमार यांनी म्हटलं की, पोलिसांनी अद्याप फोन केलेला नाही. पोलिसांनी फोन केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांची आरती करून हार घालू आणि धन्यवाद देऊ अशी प्रतिक्रिया दिली.  (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीची हत्या एका तरुणाने केली. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर २० ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात पोहचला असता त्याठिकाणी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यानी ठिय्या मांडला. यावेळीठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख नीरज कुमार यांनी भाषण केले.

हे भाषण पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे होते. कल्याण पूर्वेत नशेखोर खुलेआम फिरतात. तसेच नागरिकांवर शस्त्रांनी हल्ले होत आहेत. आईसमोर मुलीची चाकूने हत्या केली जाते. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न होतो. आम्ही करदाते नागरिक आहोत. आमची सुरक्षा करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या बदल्यात पोलिसांना पगार मिळतो, असं नीरज कुमारने म्हटलं होतं. (National News)

पोलिसांना किती हप्ता पाहिजे. पगार पुरत नसेल तर आम्ही लोकवर्गणी काढून पैसे देऊ, असे भाषण नीरज कुमार यांनी केले होते. नीरज कुमार यांच्या भाषणाची व्हीडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याची दखल घेत पोलिसांच्या विरोधात भाषण केल्याप्रकरणी नीरज कुमारसह पाच जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरज कुमार हे व्यवसायाने वकील आहेत. यासंदर्भात नीरज कुमार यांनी,पोलिसांना जाब विचारण्याकरता मोर्चा काढला होता. पोलिसांना मोर्चा झोंबला आहे. पोलिसांनी आमच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या मार्गाने पोलिसांना हार घालून त्यांची आरती ओवाळू .

सत्य मांडण्याचे काम करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि गृह मंत्रालयाचा निषेध करतो . पोलिसांकडून यासंदर्भात अद्याप बोलावणे आलेले नाही. बोलवणे आल्यास आम्ही नक्कीच जाऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT