अंबरनाथमध्ये पालिकेकडून शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये पालिकेकडून शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम

अंबरनाथमध्ये पालिकेकडून शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी कोविशिल्ड लसीचे ७५० डोस उपलब्ध करुन देण्यात आले.

अजय दुधाणे

अंबरनाथ : राज्यात शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये पालिकेच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत शिक्षकांसाठी तब्बल ७५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Special vaccination campaign for teachers by the municipality in Ambernath)

हे देखील पहा -

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रंन्टलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये शिक्षकांसाठी कुठलीही विशेष मोहीम सुरु करण्यात आलेली नव्हती. राज्यात येत्या काही काळात शाळा पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचं बनलं होतं. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने आज शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेत ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर शिक्षकांसाठी कोव्हीशिल्ड लसीचे ७५० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या लसीकरण मोहिमेला शिक्षकांनी सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी केली असून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक शिक्षकाची तपासणी करून त्यांना लस दिली जातेय. या लसीकरण मोहिमेनंतर लस घेतलेल्या शिक्षकांनीही समाधान व्यक्त केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

IPL 2024 Mega Auction: IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

SCROLL FOR NEXT