Congress Saam Tv
मुंबई/पुणे

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग प्रकरणी आज काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात काँग्रेसने आज देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. महाराष्ट्रातही निदर्शने सुरू आहेत. मुंबईसह नागपुरात मोठे निदर्शने सुरू आहेत, नेत्यांसह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबईतील आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार भाई जगताप, आमदार प्रणिती शिंदे सहभागी झाले आहेत. तर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर आमदार भाई जगताप यांनाही ताब्यात घेतले आहे.

या आंदोलनात काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा सुरु आहेत. या अगोदर काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांचीही ईडी चौकशी करण्यात आली. राहुल गांधी यांची तीन दिवस ईडीने चौकशी केली होती. त्यावेळीही काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. ईडीने सोनिया गांधी यांना याअगोदरही चौकशीसाठी समन्स पाठवले होते, पण सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू असल्याने चौकशी पुढे ढकलण्यात आली होती.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करत असलेले अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज ईडी समोर चौकशीसाठी हजर होणार आहेत.

त्याविरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा दिल्लीसह देशभरात निदर्शने करण्याची रणनीती आखली आहे. सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या या मोर्चामध्ये नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार असलचयही माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT