सोनिया गांधींची आज ईडी चौकशी, काँग्रेस नेत्यांची मुंबईसह देशभरात निदर्शनं

सोनिया गांधी आज ईडी समोर चौकशीसाठी हजर होणार आहेत.
Sonia Gandhi ED Summons National Herald case Latest Update
Sonia Gandhi ED Summons National Herald case Latest UpdateSAAM TV
Published On

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करत असलेले अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज ईडी समोर चौकशीसाठी हजर होणार आहेत.

त्याविरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा दिल्लीसह देशभरात निदर्शने करण्याची रणनीती आखली आहे. सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या या मोर्चामध्ये नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार असलचयही माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत.

राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीदरम्यान काँग्रेसने ज्या प्रकारे दिल्लीच्या रस्त्यावर 'ताकद' दाखवली. तेच दृश्य आता गुरुवारी पुन्हा पाहायला मिळणार आहे. गुरुवारी सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात जाणार आहे. त्यानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधींच्या चौकशीदरम्यान झालेल्या निषेधापेक्षा हे आंदोलन मोठे असू शकते. त्यादृष्टीने काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते तयारीत व्यस्त आहेत. पोलीसही याबाबत सतर्क झाले आहेत.

हे देखील पाहा -

सोनिया गांधींना ईडीचं समन्स

यापूर्वी देखील या प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. पण राहुल गांधी मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. मात्र आता सोनिया गांधी कोरोनमुक्त झाल्या असून आज सोनिया गांधींची ईडी चौकशी होणार आहे.

Sonia Gandhi ED Summons National Herald case Latest Update
Buldhana: नगरपरिषद कार्यालय जळगाव जामोद येथे विविध मागण्यासाठी लक्षवेधी आंदोलन

यापूर्वी जूनमध्ये राहुल गांधींची 5 दिवस किमान 50 तास चौकशी

या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही पाच दिवसांत किमान 50 तास चौकशी झाली आहे. यावेळी पीएमएलए अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांची चौकशी ही ईडी चौकशीचा एक भाग आहे.

काँग्रेसने राहुल गांधी यांच्या चौकशीमुळे आंदोलने केली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून, ईडीची कारवाई ही सूडाचे राजकारण असल्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com