Some protesters were drunk; Police investigation revealed about st workers Saam Tv
मुंबई/पुणे

ST Workers Protest: काही आंदोलक दारु प्यायले होते; पोलीस तपासात उघड

Sharad Pawar Latest News: माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सदावर्ते यांनी आम्ही 'शरद पवार' यांच्या घरात जाऊन जाब विचारू असे म्हणत एसटी कामगारांना चिथावनी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सुरज सावंत

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या घटनेबाबत आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पवारांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करणाऱ्या या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहीजण चक्क दारु (Alcohol) पिऊन आंदोलनात सामील झाले होते. 7 एप्रिलला केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कामगार भडकले. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सदावर्ते यांनी आम्ही 'शरद पवार' यांच्या घरात जाऊन जाब विचारू असे म्हणत एसटी कामगारांना चिथावनी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Some protesters were drunk; Police investigation revealed about st workers)

हे देखील पहा -

एफआयआरमध्ये माहिती उघड

शरद पवार यांच्या घरी जे आंदोलकल गेले होते त्यातील काहींनी मद्यप्राशन केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याबाबतच्या एफआयआरमध्ये (FIR) ही माहिती उघड झाली आहे. शुक्रवारी पवारांच्या घरावर हजारोंच्या संख्येत एसटी कर्मचारी चालून आले होते. यावेळी शरद पवारांच्या घरावर काहींनी दगडफेक केली, तर काहींनी चपला फेकल्या होत्या. याबाब पोलिसांना एकुण १०३ आंदोलकांना अटक केली आहे. तसेत वकिल गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक केली गेली आहे. आज या सगळ्यांना किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल, गुरुवारी सुनावणी होऊन, त्याबाबत निकाल देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही, असं परब यांनी सांगितलं होतं.

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधांतरी राहिला होता. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT