'साम टीव्ही'च्या बातमीनंतर 'त्या' बेशुद्ध ST कर्मचाऱ्याला वैद्यकीय मदत

ST Workers Protest: मिळालेल्या माहितीनुसार या कर्मचाऱ्याचं नाव विकास तांडेल (Vikas Tandel) असून हा कर्मचारी पालघर बस डेपोमधील (Palghar Bus Depot) कर्मचारी आहे.
Medical aid to agitating ST employee of Palghar depot after 'Saam' TV news
Medical aid to agitating ST employee of Palghar depot after 'Saam' TV newsSaam Tv

मुंबई: आझाद मैदानातून संपकरी एसटी कर्मचारी आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास मध्य रेल्वेवरील (Central Railway) सीएसएमटी (CSMT) स्थानकावर आले. पोलिसांनी विनातिकीट असलेल्या आंदोलकांना स्थानकाबाहेर काढले. त्याचवेळी एका एसटी कर्मचाऱ्याची तब्येत खालावली. तो सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या आवारात चक्कर येऊन जमिनीवर पडला. तो बेशुद्धावस्थेत होता. याबाबत 'साम टीव्ही'ने (Saam Tv Impact) सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत, तातडीने त्या एसटी कर्मचाऱ्याला प्रथमोपचार दिले. त्यानंतर कर्मचारी शुद्धीवर आला. त्याला पाणी आणि नाश्ता दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. (Medical aid to agitating ST employee of Palghar depot after 'Saam' TV news)

हे देखील पहा -

मिळालेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्याचं नाव विकास तांडेल (Vikas Tandel) असून, हा कर्मचारी पालघर बस डेपोमधील (Palghar Bus Depot) कर्मचारी आहे. त्यानं सांगितलं की, मला रक्तदाबाचा (BP) त्रास आहे. त्यात पोलिसांनी धरपकड सुरू केल्यामुळे रक्तदाब वाढला आणि मला अस्वस्थ वाटू लागलं. याआधीही हा कर्मचारी रडत आपली व्यथा मांडताना दिसला होता. आम्ही रुग्णवाहिकेला पाचारण केलं असून, ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांना उपचार मिळतील, असे पोलिसांनी सांगितलं.

Medical aid to agitating ST employee of Palghar depot after 'Saam' TV news
आंदोलन कर पण तिकीट दाखव; विनातिकीट ST कर्मचाऱ्यांना CSMT स्थानकावरुन बाहेर काढलं

या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याला काल, शुक्रवारच्या आंदोलनाबाबत काहीही माहिती नाही. तो म्हणाला की, मी पाच महिन्यांपासून पालघरवरून येतो आणि आझाद मैदानात शांत बसतो. मी मराठी माणूस आहे. मला या सरकारनं वेडं बनवलं आहे, असं सांगत या कर्मचाऱ्यानं प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com